“काही नागरिकांचे मॅपिंग अपूर्ण; अपूर्ण राहिलेल्यांनी BLO शी तात्काळ संपर्क साधावा — प्रांताधिकारी भूषण अहीरे यांचे आवाहन!”

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) : मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पाचोरा विधानसभा मतदारसंघ क्र. 18 मध्ये सन 2002 च्या मतदार यादीतील मतदारांचे सन 2024 च्या अद्ययावत मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्या मार्फत विशेष मोहीम राबवून करण्यात आले.
मात्र, अनेक भागांमध्ये मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच काही ठिकाणी संबंधित मतदारांची आवश्यक माहिती उपलब्ध न झाल्याने अनेक मतदारांचे मॅपिंग अद्याप अपूर्ण राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही त्यांनी तात्काळ आपल्या क्षेत्रातील BLO यांच्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती सादर करावी व आपले मॅपिंग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन प्रांताधिकारी भूषण अहीरे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर बाब ही जनहिताची असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद