ग्रामीण कष्टातून यशाची शिखरे गाठणारी जागृती पाटील; दहावीत 89.4% गुणांसह दुहेरी कामगिरी!”
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील कुमारी जागृती विनोद पाटील हिने सीबीएससी पॅटर्नच्या दहावीच्या परीक्षेत तब्बल 89.4% गुण मिळवत उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यश संपादन केले आहे. शिवसेना तालुकाप्रमुख श्री. विनोद पाटील यांची सुकन्या असलेल्या जागृतीने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभ्यासात सातत्य, जिद्द आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या जोरावर जागृतीने हे यश मिळवले असून, ती एक उत्कृष्ट बास्केटबॉलपटू म्हणूनही ओळखली जाते. शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल साधत तिने केलेली ही दुहेरी कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊन उच्च यश संपादन करणे हे सहज शक्य नसते; मात्र जागृतीने आपल्या चिकाटीने आणि मेहनतीने हे आव्हान पेलत इतर विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या कार्याची दखल घेतली जात आहे.
जागृती पाटील हिची ही यशस्वी वाटचाल निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तिच्या पुढील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
शुभेच्छुक सर्व पत्रकार परिवार पाचोरा तालुका ग्रामीण परिसर
Comments
Post a Comment