शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा दमदार विक्रम! सलग सातव्या वर्षी 100% निकाल; विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी


राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : सन 2025–26 मध्ये घेण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा उत्कृष्टतेचा झेंडा रोवला आहे. सलग सातव्या वर्षी शतप्रतिशत निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेने आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. शाळेतील अनुभवी व समर्पित शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्यात शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, उपाध्यक्ष नीरज मुणोत, सेक्रेटरी ॲड. जे.डी. काटकर, सहसचिव डॉ. शिवाजी शिंदे, संचालक अमोलभाऊ शिंदे, सौ. पूजाताई शिंदे तसेच प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
कुणाल किशोर पाटील – 93% (प्रथम)
देवेश अभिमान पाटील – 92.2% (द्वितीय)
जागृती विनोद तावडे – 89.4% (तृतीय)
स्वराली राहुल पाटील – 88.8%
सिद्धार्थ प्रताप पाटील – 88.4%
आरुषी उमेश शामनानी – 87.8%
विस्मय प्रकाश सुराणा – 86.8%
गुंजन प्रकाश दुलानी – 84.6%
खुशी हसनंद पंजाबी – 84.2%
धैर्यशील रामेश्वर पाटील – 84%
शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा हा यशस्वी प्रवास केवळ निकालापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श नमुना ठरत आहे. सलग सात वर्षांची ही परंपरा पुढील काळातही अधिक भक्कम होईल, असा विश्वास पालक व नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद