“जनतेच्या दारी तत्पर सेवा” : प्रभाग 10 मध्ये नंदू पाटील यांची आक्रमक कार्यशैली, तक्रारींवर तात्काळ निवारण
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये लोकाभिमुख कामासाठी ओळख निर्माण करणारे नगरसेवक श्री. नंदू पाटील हे नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच आपल्या पत्नीला उमेदवारी देत विजय मिळवल्यानंतर त्यांनी जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे.
श्री बालाजी ग्रुपचे संचालक, पाचोरा पीपल बँक तसेच मार्केट कमिटीचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. निवडणुकीनंतर “जनतेसाठी प्रत्यक्ष मैदानात” उतरून काम करण्याचा त्यांचा संकल्प प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.
दररोज सकाळी प्रभागात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणे, त्यांच्या घरी जाऊन समस्या जाणून घेणे आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे नागरिकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे.
स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा याकडे विशेष लक्ष देत त्यांनी प्रभागातील मोकळ्या जागेत महादेव मंदिर उभारले असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अभियानही राबवले आहे. प्रभाग अधिक सुस्थितीत आणि आदर्श बनवण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
सर्वांशी मैत्रीपूर्ण वागणूक, वाद टाळण्याची भूमिका आणि सदैव हसतमुख राहण्याची त्यांची शैली यामुळे “नंदू बालाजी” म्हणून ते शहरात परिचित झाले आहेत. समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी केवळ आर्थिक नव्हे, तर मानवी मूल्यांचीही जपणूक केली आहे.
Comments
Post a Comment