पाचोरा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल : गंभीर मारहाण प्रकरणात आरोपींना शिक्षा; पोलीस हवालदार दीपक पाटील व विकास सूर्यवंशी यांचा जिल्हा स्तरावर गौरव
राजेंद्र खैरनार संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) :
पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील गंभीर मारहाण प्रकरणात मा. न्यायालय, पाचोरा यांनी आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली असून या प्रकरणातील उत्कृष्ट केस वॉच आणि प्रभावी पैरवीबद्दल पोलीस हवालदार दीपक पाटील व पोलीस हवालदार विकास सूर्यवंशी यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव करण्यात आला आहे.
मा. न्यायालय, पाचोरा येथे दि. 12 जानेवारी 2026 रोजी मा. श्री. एस. व्ही. निमसे यांच्या न्यायालयात गुन्हा रजिस्टर क्रमांक 217/2020 (भा.द.वि. कलम 326, 324, 323, 504, 506) या प्रकरणाचा निकाल लागला. या प्रकरणात फिर्यादी गौतम किसन अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहेबराव किसन अहिरे व इतर दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
RCC क्रमांक 250/2020 या प्रकरणात न्यायालयाने CRPC 248(2) नुसार आरोपींना दोषी ठरवत पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली –
भा.द.वि. कलम 326 अंतर्गत 6 महिने सश्रम कारावास व 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास 7 दिवस साधा कारावास
भा.द.वि. कलम 324 अंतर्गत 3 महिने साधा कारावास व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 7 दिवस साधा कारावास
भा.द.वि. कलम 323 अंतर्गत 1 महिना साधा कारावास व 300 रुपये दंड, दंड न भरल्यास 7 दिवस साधा कारावास
तसेच भा.द.वि. कलम 504 व 506 अंतर्गत आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास स. फौ. 694 (निवृत्त) यांनी केला होता. तर सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. चंद्रकांत नाईकवाडे, सहायक सरकारी अभियोक्ता प्रशांत भावसार तसेच अॅड. करुणाकर ब्राह्मणे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
या संपूर्ण प्रकरणात पाचोरा विभागाचे SDPO बापू रोहम तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच पैरवी अधिकारी पोलीस हवालदार दीपक प्रल्हाद पाटील (HC 920) आणि केस वॉच पोलीस हवालदार विकास राम सूर्यवंशी (HC 2903) यांनी प्रकरणाचा काटेकोर पाठपुरावा केला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते दोघांचा “उत्कृष्ट केस वॉच” व “उत्कृष्ट पैरवी अधिकारी” म्हणून गौरव करण्यात आला.
या निकालामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस तपास, प्रभावी पैरवी आणि न्यायालयीन प्रक्रियेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Comments
Post a Comment