पाचोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची दमदार कामगिरी; पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तिपत्र देऊन गौरव

राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य न्यूज चॅनल
पाचोरा :(जळगाव)
पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पो.हे.कॉ./६२५ श्री. राहुल काशिनाथ शिंपी यांच्या उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. तत्पर महेश्वर रेही यांनी त्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित केले आहे.
पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील भाग क्र. ५, गु.र.नं. २१/२०२६, CCTNS No. 512/2025, BNS कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास करताना राहुल शिंपी यांनी अत्यंत तत्परता दाखवत अल्पावधीतच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीकडून सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील हरवलेले दोन मोबाईल फोन देखील हस्तगत करण्यात आले.
तसेच आरोपीविरुद्ध अवघ्या २४ तासांच्या आत माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून कार्यक्षमता दाखवली.
याशिवाय हरवलेल्या एका अल्पवयीन बालकाचा अवघ्या दहा दिवसांत शोध घेऊन त्याला दिल्ली येथून सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर त्याला सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी राहुल काशिनाथ शिंपी यांचे अभिनंदन करत त्यांच्या सेवेमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिष्ठा अधिक उंचावल्याचे सांगितले. भविष्यातही त्यांनी अशीच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवा देत न्यायव्यवस्थेच्या कार्याला बळ द्यावे, अशा शुभेच्छा देत दि. ११ मार्च २०२६ रोजी त्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद