कोळगाव महाविद्यालयात मातृ सन्मान दिवस उत्साहात साजरा
कोळगाव - येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव येथे जागतिक महिला दिवस व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्त मातृ सन्मान निमित्ताने सर्व महिला शिक्षक यांना महाविद्यालय तर्फे सन्मान करून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी होते तसेच भूगोल विभाग प्रमुख प्रा मनोज पवार होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तात्यासाहेब हरी रावजी पाटील, सावित्रीबाई फुले,माता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.प्रा माया मराठे यांनी महिलांनी शिक्षणा सोबत समाज कार्य, ग्रुपचर्चा आठवड्या तून एक रविवार गेट टू गेदर करून संपर्क केला तर मैत्री वाढते असे मार्गदर्शन केले प्रा प्रविणा डी पाटील यांनी शाळेत मुलीच्या समस्या जाणून त्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत,गुड टच बॅड टच या बाबत विद्यार्थिनीना मार्गद र्शन केले पाहिजे अशी माहिती सांगितली यावेळी प्रा सोनाली पाटील, प्रा चैताली पाटील,प्रा तृप्ती भामरे, प्रा चारूलता पाटील, प्रा प्रतिभा केदार उपस्थित होते प्रा सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले आभार प्रा मनीषा बोरसे यांनी केले
Comments
Post a Comment