शेठ मु. मा. महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान सोहळा संपन्न
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक न्यूज सत्य शोध चॅनल
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा दि. 10 - पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा जि. जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 08 मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त दि. 09 मार्च रोजी महाविद्यालयातील प्राध्यापिका व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांचा पाचोरा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मा. ताईसाहेब सौ. सुचेताताई दिलीप वाघ, पाचोरा तनिष्का ग्रुपच्या अध्यक्षा मा. ताईसाहेब सौ. ज्योतीताई संजय वाघ, मा. ताईसाहेब सौ. सरलाताई राजेंद्र पाटील व मा. ताईसाहेब सौ. सुरेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मा. डॉ. सुनीता गुंजाळ यांचे ‘महिला व आजचे वास्तव’ या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांच्या हक्कासाठी झालेल्या आंदोलनांची पार्श्वभूमी मांडत महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या शिक्षणाची टक्केवारी प्रगत देशांप्रमाणे वाढली पाहिजे असे प्रतिपादन केले.
मा. ताईसाहेब सौ. सुचेताताई वाघ यांनी “एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते, जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला साथ देते तेव्हा इतिहास घडतो,” असे सांगत मुलींनी आपल्या आई-वडिलांचे नाव उंचावण्यासाठी महाविद्यालयातून चांगल्या संस्कारांची शिदोरी घ्यावी असा विचार मांडला.
तर मा. ताईसाहेब सौ. सरलाताई पाटील यांनी राजमाता जिजाऊ भोसले, महाराणी ताराबाई भोसले, झाशीची राणी लक्ष्मीबाई व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारातून महाराष्ट्राच्या मुलींनी संस्कार घेतले पाहिजे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले हे होते. त्यांनी आजची स्त्री ‘चूल आणि मुल’ इथपर्यंत मर्यादित राहिलेली नाही, तर ती अंतराळात जात आहे, कॉर्पोरेट जग गाजवत आहे व सीमेवर देशाचे रक्षणही करत आहे. या आचार-विचारांचे आपण पाईक व्हावे असा संदेशही त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
याप्रसंगी कार्यक्रमाला उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. आर. बी. वळवी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. अमित गायकवाड, डॉ. सरोज अग्रवाल, डॉ. सुवर्णा पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. संजिदा शेख, प्रा. लक्ष्मी गलाणी, डॉ. सपना रावते, प्रा. सुनीता तडवी, प्रा. जयश्री महाजन, प्रा. रश्मी सूर्यवंशी, प्रा. राखी देशमुख, श्रीमती ज्योती जाधव, श्री. सुरेंद्र तांबे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक प्रा. स्वप्नील भोसले तर आभार डॉ. के. एस. इंगळे यांनी केले.
Comments
Post a Comment