पाचोरा तालुका स्तरीय"व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता " प्रशिक्षण संपन्न


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चैनल
पाचोरा-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगाव आणि पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा तर्फे तालुकास्तरीय "व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता " या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन केले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांनी काम पाहिले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून रवींद्र चौधरी नवजीवन विद्यालय व मच्छिन्द्र कोळी वरखेडी विद्यालय यांनी दोन दिवस मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व एक सहशिक्षक उपस्थित होते.इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भावी जीवनातील विकासासाठी सदर प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी उदघाटकीय मनोगतात केले.मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थी संघ, पालक शिक्षक संघ यांच्या सहकार्याने व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता या संदर्भात विविध उपक्रम शाळेत घेण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. सूत्रसंचालन दिलीप सोनवणे यांनी केले. आभार संजू राठोड यांनी मानले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक लहू पवार, मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष किरण पाटील, मुख्याध्यापक शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक समाधान महाजन, मुख्याध्यापक समाधान पाटील,विषयतज्ञ गिरीश भोयर, प्रा. जे व्ही पाटील, रावसाहेब साळुंखे, जयदीप पाटील यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद