कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला सलाम; रोटरी क्लब पाचोरा-भडगावकडून २५ महिलांचा सन्मान
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या वतीने पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, उपप्रांतपाल किरण देशमुख, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, डॉ. अजयसिंग परदेशी तसेच पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या पीएसआय कल्याणीजी वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांना आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त करून देणाऱ्या शैलेश कुलकर्णी यांच्या ‘कलाछंद टीम’चा मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच रोटरी क्लबतर्फे आयोजित गणपती आरास सजावट स्पर्धेतील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला.
महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनीताताई पाटील, पीएसआय कल्याणी वर्मा, तहसीलदार शीतल सोलाट, उद्योजिका वैशाली सूर्यवंशी, सुरेखा खानोरे (गायत्री परिवार), जि.प. शिक्षिका उज्वला वाडेकर, स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजर संगीता शिंदे, डॉ. संगीता पाटील, रिलस्टार क्रांती पाटील, डॉ. प्रतिभा ढाकरे, पर्यवेक्षिका कुंदा पाटील, शिक्षिका सपना शिंदे, रुपाली सांगडे, अनुपमा शेवाळे, चारुशीला नैनाव, दुर्गा राठोड, प्रगती शेळके (नगरपालिका पाचोरा), शीतल सूर्यवंशी, ममता अग्रवाल, रुपाली जोशी (तांबूल उद्योजिका), इशिता सेठ (उद्योजिका), जयश्री मराठे (योग शिक्षिका), अश्विनी पिंगळे (पिग्मी एजंट), स्नेहा पवार, आशा भुजंगे (रिक्षा चालक) आणि सुनीता चव्हाण (नगरपालिका सफाई कामगार) अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विशेष सत्कारही करण्यात आले. रोटरी सदस्य कै. अरुणा उदावंत यांच्या रोटरीतील योगदानाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला. तसेच पाचोरा येथील अग्निशमन अधिकारी दत्तात्रय पाटील, मुकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे आणि मानवेल सालोमन जॅक्सन डान्स अकॅडेमी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सदस्य भरत सिनकर, वैशाली सूर्यवंशी, डॉ. घनश्याम चौधरी, डॉ. किशोर पाटील, संजय कोतकर, प्रदीप पाटील, राजेश मोर, निलेश कोटेचा, ज्ञानेश्वर पाचोळे, गिरीश दुसाने, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. अमोल जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. पंकज शिंदे, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. मुकेश राठोड, उज्वल ठाकरे, डॉ. कुणाल पाटील, मनोज केसवानी, चिंतामण पाटील, पिंकीताई जिनोदिया, रावसाहेब पाटील, नितीन तायडे, अमोल झेरवाल, डॉ. प्रतिभा तेली, हर्षदा कोतकर, सौ. विद्या कोतकर, प्रतिभा लहिवाल तसेच रोटरीचे नूतन सदस्य डॉ. किरण राजपूत आणि डॉ. रोहित तावरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी शिंदे आणि डॉ. प्रशांत सांगडे यांनी केले.
Comments
Post a Comment