रोटरी डिस्ट्रिक्टच्या यशात रोटरी क्लब पाचोरा-भडगावचा सिंहाचा वाटा; प्रांतापाल ज्ञानेश्वर शेवाळे यांची प्रशंसा

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
रोटरी वर्षात रोटरी इंटरनॅशनलच्या “युनाइट फॉर गुड” या थीमला साजेसे काम रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांनी केल्याबद्दल प्रांतापाल भेटीदरम्यान रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतापाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी क्लबच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी 1000 नवीन रोटरी सदस्य नोंदणी, 30 नवीन क्लबची स्थापना, 10 लाख डॉलरचे भरीव योगदान, 5086 बॉटल रक्तसंकलन तसेच रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांनी साकारलेली महा रांगोळीचा विश्वविक्रम अशा अनेक उल्लेखनीय कामगिरीचा प्रांतापालांनी विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या मंचावर प्रांतापाल ज्ञानेश्वर शेवाळे, उपप्रांतपाल किरण देशमुख, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली व सचिव डॉ. अजयसिंग परदेशी उपस्थित होते.
सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांनी आर्थिक अहवाल सादर केला. त्यानंतर अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी क्लबद्वारे राबविण्यात आलेल्या जवळपास 80 प्रोजेक्ट्समधील महत्त्वाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी रोटरी क्लब पाचोरा-भडगावतर्फे डॉ. किरण राजपूत, डॉ. रोहित तावरे, नितीन तायडे, मनोज केसवानी, ज्ञानेश्वर पाचोळे व डॉ. कुणाल पाटील यांना नवीन रोटरी सदस्यत्व देण्यात आले. क्लबची कार्यपद्धती, वार्षिक अहवाल आणि प्रोजेक्ट्स याबाबत प्रांतापालांनी समाधान व्यक्त केले.
रोटरी फाउंडेशनला केलेल्या भरीव योगदानाबद्दल भरत सिनकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पुढील वर्षासाठी अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. शिवाजी शिंदे व सचिवपदी निवड झालेले डॉ. स्वप्नील पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. यावेळी क्लबचे सदस्य भरत सिनकर, राजेश मोर, प्रदीप पाटील, डॉ. अमोल जाधव, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. घनश्याम चौधरी, डॉ. कुणाल पाटील, संजय कोतकर, गिरीश दुसाने, डॉ. मुकेश राठोड, डॉ. राहुल काटकर, चिंतामण पाटील, नितीन जमदाडे, नितीन तायडे, मनोज केसवानी, उज्वल ठाकरे, प्रज्ञेश खिलोशिया, शैलेश कुलकर्णी, अमन सर, अनुपमा शेवाळे, पिंकी जिनोदिया, चारू नैनाव, डॉ. प्रतिभा तेली, विद्या कोतकर, प्रतिभा लहिवाल, हर्षदा कोतकर आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद