महिला मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम : आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व दांपत्यांचा सत्कार डॉ. किशोर पाटील यांच्याकडून महिलांची आरोग्य तपासणी; संजय कोतकर यांचे आरोग्य व डिजिटल सुरक्षिततेवर मार्गदर्शन

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:
समाजातील महिलांचे आरोग्य, जागरूकता आणि कुटुंबातील मूल्य जपण्यासाठी उन्नती महिला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तीन कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किशोर पाटील, एलआयसी अधिकारी संजय कोतकर तसेच महिला मंडळ अध्यक्षा सौ. संगीताताई येवले उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान डॉ. किशोर पाटील यांनी उपस्थित महिला भगिनींची आरोग्य तपासणी केली तसेच रक्तदाब व इतर तपासण्या करून त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. आवश्यक त्या महिलांना योग्य औषधोपचार घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांनी नियमित व्यायाम करणे, सकाळी पायी फिरणे आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी एलआयसी अधिकारी संजय कोतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी फळे, भाजीपाला व पौष्टिक आहार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आधुनिक काळात मोबाईलचा वापर करताना सुरक्षिततेची काळजी घेणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा पासवर्ड कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला सांगून ठेवावा किंवा डायरीत नोंद करून ठेवावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमात समाजातील तीन कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी पूजाविधी भडजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला उन्नती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगीताताई येवले यांच्यासह मीनाताई येवले, मनीषाताई येवले, विद्याताई कोतकर, चारुताई येवले, मंगलाताई पाटे, भारतीताई येवले, सुनिताताई महालपुरे, शुभांगीताई येवले तसेच इतर महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघाताई येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. विद्याताई कोतकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद