गाळण येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; १०२३ लाभांचे वितरण


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल 
पाचोरा (प्रतिनिधी):
दि. ७ मार्च २०२६ रोजी पाचोरा तालुक्यातील गाळण बु. येथे शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते करण्यात आली.
शिबिराची प्रस्तावना पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे यांनी मांडली, तर सूत्रसंचालन मंडळ अधिकारी सचिन मोरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात प्रजेच्या अडचणी तत्काळ सोडविण्याची परंपरा निर्माण केली होती. त्याच विचारातून शासनाने नागरिकांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून महसूल, ग्रामपंचायत, कृषी, सामाजिक न्याय, आरोग्य, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ तसेच इतर विविध शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी व अर्ज स्वीकृत करून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गाळण मंडळ व परिसरातील हजारो नागरिकांनी शिबिराला उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घेतली तसेच अर्ज व फॉर्म भरून दिले.
शिबिरात संजय गांधी योजनेचे लाभार्थी, कृषी विभागामार्फत शेती उपयोगी अवजारे वाटप, पुरवठा विभागाकडून ई-शिधापत्रिका वाटप, एस.टी. महामंडळाचे NCMC कार्ड नोंदणी, वारस दाखल ७/१२, सातबारा दुरुस्ती, उत्पन्न दाखले तसेच घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या लाभांचे वितरण उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार विजय बनसोडे, कृषी अधिकारी सुधाकर कराड तसेच पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर राजेंद्र रामभाऊ पाटील, सतीश प्रकाश जाधव, रमेश हिरामण राठोड, आत्माराम हरी राठोड, डॉ. बी.बी. राजपूत, लीलाधर मुकुंदा पाटील, डॉ. पी.एन. पाटील, अनिल धना पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विनोद कुमावत, प्रमोद मोरे, प्रतिभा राजपूत, सुषमा उरकुडे, मंडळ अधिकारी आर.डी. पाटील, सचिन मोरे, ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र शिरसाठ, अतुल पाटील, सागर बागुल, योगेश पाटील, बबन मंडले, तात्याराव सपकाळ, प्रीती पाटील, महसूल सेवक, पोलीस पाटील, रेशन दुकानदार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून एकूण १०२३ लाभांचे वितरण करण्यात आले असून नागरिकांच्या अडचणी थेट त्यांच्या दारी जाऊन सोडवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद