केरळमध्ये वासुदेवाच्या रूपात विकास वाघमारे; आंतरराज्य युवा कार्यक्रमात महाराष्ट्राची छाप
केरळ राज्यातील थ्रिसूर जिल्ह्याच्या महानगरपालिकेत आयोजित आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवकांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांची जिज्ञासा वाढावी तसेच देशातील विविध राज्यांची परंपरा, संस्कृती, खाद्यसंस्कृती, पर्यटन, प्रशासन आणि व्यवसायातील संधी यांची ओळख व्हावी या उद्देशाने युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला महापौर ए. प्रसाद, उपमहापौर डॉ.निजी जस्टिन,नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्रातील माय भारत चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी थ्रिसूर जिल्हा युवा अधिकारी मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी छ.संभाजीनगर देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास तातेराव वाघमारे याने केरळ मध्ये वासुदेवाची हुबेहूब वेशभूषा करून केरळ वासियांचे लक्ष वेधून घेतले व केरळ मध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवली.
या अनोख्या क्षणामुळे महाराष्ट्र आणि केरळ यांच्यातील सांस्कृतिक मैत्री अधिक दृढ झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment