भडगाव येथे माऊली फाउंडेशनचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
भडगाव-प्रतिनिधी  
गेल्या दहा वर्षापासून विविध सामाजिक कार्यातून जनतेसाठी सेवाभावी उपक्रम राबवणाऱ्या माऊली फाउंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही "रक्तदान शिबिर" आयोजित करण्यात आले होते. यात ६१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला .१ मार्च रोजी पार पडलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन   प्राथमिक शिक्षक असलेले नियमित रक्तदाते सचिन पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्व लनाने  करण्यात आले.याप्रसंगी माऊली फाउंडेशन चे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगीता जाधव व फाउंडेशनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्यातून घेण्यात आलेल्या यावर्षीच्या रक्तदान शिबिरात आपल्या  वाढदिवसा निमित्त प्राथमिक शिक्षक असलेले जितेंद्र पाटील यांनी पत्नी निकिता पाटील यांच्यासह रक्तदान केले. तसेच अंजली हॉस्पिटलच्या डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. नियमित रक्तदान करणारे रोकडा फार्म येथील दिव्यांग रक्तदाते ज्ञानेश्वर पाटील यांनीही रक्तदान केल शिबिराच्या प्रारंभी हैदराबाद येथे वैद्यकीय सेवेत असलेले व नियमितपणे माऊली फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात सहभागी होणारे डॉ.निलेश महाजन यांनी रक्तदान केले. यावर्षीच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या शिबिरामध्ये प्रथमच तब्बल ९ महिलांनी रक्तदान केले. आजच्या रक्तदान शिबिर प्रसंगी सलग ११व्या यशस्वी रक्तदान शिबीर आयोजनाबद्दल रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने माऊली फाउंडे शनचा सत्कार करण्यात आला. तसेच शिबिर आयोजनाबद्दल करीमाखान, वैशाली पाटील, सोनाली थडकर  व संजय सपकाळे यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
   दरवर्षी माऊली फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरात भडगाव शहर व तालुक्यातील विविध भागातील, विविध स्तरातील रक्तदाते रक्तदान करीत असतात. माऊली फाउंडेशनच्या होणाऱ्या रक्तदान शिबिरास दरवर्षी भरभरून प्रतिसाद मिळतो. माऊली फाउंडेशनच्या वतीने सन २०१८ पासून नेहमीच रक्तदान शिबिर घेतले जात असून आजवर साधारणपणे दीड हजारच्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरास भडगाव शहरातील वैद्यकीय व्यावसायिक राजकीय पदाधिकारी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, व्यावसायिक बांधव, पत्रकार  यांनी हजेरी लावली.या रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी माऊली फाउंडेशनचे स्वयंसेवक जाकीर कुरेशी, योगेश शिंपी, गणेश पाटील, प्रवीण पाटील,संजय सोनार,मीरा जाधव, सुरेश रोकडे, प्रा.सुरेश कोळी, मनोहर जाधव, रवी पाटील, प्रदीप मासरे, दिलीप महाजन  अथक परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद