भडगाव शहरात धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियान

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
भडगाव -डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता अलिबाग नानासाहेब प्रतिष्ठान मार्फत भडगाव शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात 239 श्रीसेवक असून 10 ट्रॅक्टर बस स्टॉप,डि.एड. कॉलेज गिरणा कॉलनी, पेठ, गणपती मंदिर, भवानी बाग,तहसील कार्यालय नगरपरिषद या परि सरात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानास भडगाव नगरपरिषद च्या नगराध्यक्षा सौ रेखा मालचे, उप नगराध्यक्ष राजेंद्र पाटील (जिभाऊ,) पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कोष्टी मॅडम,एस टी महामंडळ भडगावचे नियंत्रक पी एम राठोड सकाळचे वार्ताहर निंबाजी पाटील लोकमतचे अशोक परदेशीं, तरुण भारतचे प्रा. सुरेश कोळी उपस्थित होते श्री सदस्य,नागरिक मोठया संख्येने स्वच्छता अभियानमध्ये सहभागी होते  या स्वच्छता अभियानात 7.80 टन कचरा संकलित करण्यात आला नगरपरिषद तर्फे मोठया प्रमाणात कचरा संकलन केले जाते ते फक्त अनुदान वापरता यावे असच वाटते नगरपरिषदेने सामाजिक भान ठेऊन कार्य केल्यास स्वच्छ भडगाव होऊ शकते याचा विचार नवं नियुक्त पदाधिकारी यांनी करावा या अभियानचे नागरिकांकडून प्रसंशा करण्यात आली

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद