केरळमध्ये जळगावचा झेंडा फडकणार! एम.एम. पाचोरा महाविद्यालयाच्या चेतना हिरे यांची राष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य  शोध न्युज चॅनल
पाचोरा / जळगाव (प्रतिनिधी):
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा भारत युवा केंद्र’ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांतर्गत आयोजित आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी एम.एम. पाचोरा महाविद्यालयाच्या कु. चेतना रणदीप हिरे यांची निवड झाल्याने जळगाव जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर मानाचा गौरव प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चेतना हिरे यांची या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड झाल्याने जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या सोबत जिल्ह्यातील आणखी आठ युवकांचीही निवड झाली असून, एकूण नऊ युवकांचा हा प्रतिनिधी गट २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत केरळ राज्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक दौऱ्यावर सहभागी होणार आहे. या गटाद्वारे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून होणार आहे. सदर दौरा कमलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
या राष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विविध राज्यांतील युवकांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे, नेतृत्वगुणांचा विकास घडविणे तसेच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणे हा आहे. देशभरातील विविध संस्कृती, परंपरा, शैक्षणिक पद्धती व सामाजिक उपक्रमांचा अनुभव युवकांना प्रत्यक्ष मिळावा, यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.
कु. चेतना रणदीप हिरे यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे यांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
या यशामुळे जळगाव जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर अधिक उजळून निघाला असून, जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रउभारणीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश या निवडीमुळे मिळाला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद