शासन थेट जनतेच्या दारात — वार्ड क्र. ३ भैरवनगरातील "भैरवनाथ मंदिर" येथे उद्या ६ फेब्रुवारीला रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजनेचे तात्काळ निवडणूक शिबिर...!
✍️राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा :६/२/२०२६
सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभ व वेळेत मिळावा या उद्देशाने पाचोरा तहसील कार्यालयाच्या वतीने उद्या शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत वार्ड क्रमांक ३, भैरव नगर येथील भैरवनाथ मंदिर परिसरात रेशन कार्ड व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तात्काळ निवडणूक शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन पाचोरा–भडगावचे आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या त्वरित सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे हे शिबिर नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
शिबिरात रेशन कार्ड नवीन नोंदणी, नाव समावेश, वगळणे, दुरुस्ती, पत्ता बदल तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारणे, कागदपत्र तपासणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर पाटील, उपनगराध्यक्ष श्री. किशोर आप्पा बारावकर, गटनेते तथा नगरसेवक सुमित किशोर पाटील तसेच आरोग्य सभापती व प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक श्री. सतीश आबा चेडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
वार्ड क्रमांक ३ तसेच परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment