भडगाव येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी; सामाजिक ऐक्याचे दर्शन

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
भडगाव प्रतिनिधी :
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहर यांच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती दिनांक १ फेब्रुवारी रोजी भडगाव येथे अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
सकाळी ८.३० वाजता संत रविदास महाराज मंदिरात मूर्तीपूजन, आरती व भजन कार्यक्रम पार पडला. यानंतर भडगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्येही संत रविदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महादेव गल्ली, टोणगाव व यशवंत नगर परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र येत जयंती सोहळ्यात सहभागी झाले व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत रविदास महाराज यांचे भव्य स्टेज उभारण्यात आले होते. येथे छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व वीर एकलव्य यांच्या प्रतिमा पूजनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. दिवसभर भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. यामध्ये नगराध्यक्षा रेखाताई मालचे, शशिकांत येवले, सौरव पाटील, गटनेते लखीचंद पाटील, सचिन चोरडिया, विजय भोसले, विशाल पाटील, जगन भोई, संतोष महाजन, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस निलेश ब्राह्मणकर, राजू पाटील, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, जाकीर कुरेशी, विक्रम सोनवणे तसेच डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद