नागसेन नगर व भीम नगरात रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी



राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शो़ध न्युजन चॅनल

पाचोरा प्रतिनिधी:
नागसेन नगर व भीम नगर परिसरातील समाज बांधवांच्या वतीने आयोजित रमाई भीमरावजी आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमा पूजन व हार अर्पण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक एकता व प्रेरणेचा संदेश देणारा हा कार्यक्रम परिसरात भावनिक वातावरणात संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक राहुल अंकुश गायकवाड, नगरसेवक प्रविणभाऊ  ब्राम्हणे,व त्यांच्या  अर्धांगिनी नगरसेविका वर्षाताई ब्राम्हणे, नगरसेविकापती उमेश हटकर तसेच स्थानिक मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रमाई आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, महिला सशक्तीकरण व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद