प्रभाग क्रमांक ९मध्ये सिकलसेल अॅनिमियाविरोधात संयुक्त पुढाकार; नगरसेविका दिपालीताई किशोर पाटील व नगरसेवक श्री. सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चैनल
पाचोरा प्रतिनिधी
सिकलसेल अॅनिमिया या गंभीर व आनुवंशिक आजाराविरोधात जनजागृती व तपासणीसाठी पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले. हे अभियान प्रभाग क्रमांक ९च्या नगरसेविका सौ.दिपालीताई किशोर पाटील आणि नगरसेवक तथा गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या संयुक्त पुढाकाराने राबविण्यात आले.
या आरोग्यविषयक अभियानाची औपचारिक सुरुवात नगरसेविका सौ. दिपालीताई किशोर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी त्यांनी सिकलसेल अॅनिमिया आजाराची वेळेत तपासणी, उपचार व जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील यांनी या अभियानाच्या नियोजनात मोलाचे मार्गदर्शन केले. समाजाच्या आरोग्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक असून, प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या अभियानास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. तपासणीसह आजाराविषयी मार्गदर्शन देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी वैशाली ताई महाजन, सचिन वखरे तसेच शिवसैनिकांनी विशेष मेहनत घेतली. स्वयंसेवकांच्या समन्वयातून व नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे हे अभियान प्रभावीपणे पार पडले.
नगरसेविका सौ.दिपालीताई किशोर पाटील आणि नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या संयुक्त पुढाकारातून प्रभाग क्रमांक ९ मध्ये आरोग्यविषयक उपक्रमांना गती मिळत असून, अशा लोकहिताच्या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण होत आहे.
Comments
Post a Comment