शासन थेट जनतेच्या दारात — भैरवनगरातील भैरवनाथ मंदिरात रेशनकार्ड व संजय गांधी निराधार योजनांचा तात्काळ कॅम्प उत्साहात संपन्न

✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी |
पाचोरा : दि. ६ फेब्रुवारी २०२६
सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, वेळेत आणि थेट त्यांच्या दारात मिळावा, या लोकाभिमुख उद्देशाने पाचोरा तहसील कार्यालयाच्या वतीने वार्ड क्रमांक ३, भैरवनगर येथील भैरवनाथ मंदिर परिसरात आज शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत रेशनकार्ड व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तात्काळ निवडणूक शिबिर मोठ्या संख्येने व उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
या कॅम्पचे आयोजन पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नागरिकांच्या समस्या जागेवरच ऐकून त्वरित कार्यवाही करण्यात आल्याने हा उपक्रम नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरला.
कॅम्पमध्ये पुढील सेवा देण्यात आल्या —
रेशनकार्ड नवीन नोंदणी
नाव समावेश, वगळणे व दुरुस्ती
पत्ता बदल
संजय गांधी निराधार योजना
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना
इंदिरा गांधी विधवा योजना
अपंग, निराधार, परित्यक्ता व अनाथ लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे
या सर्व योजनांबाबत सविस्तर माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. कागदपत्रांची तपासणी करून नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी मोठ्या प्रमाणावर या शिबिराचा लाभ घेतला.
या उपक्रमासाठी पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर पाटील, उपनगराध्यक्ष श्री. किशोर आप्पा बारावकर, गटनेते व नगरसेवक श्री. सुमित किशोर पाटील तसेच आरोग्य सभापती व प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक श्री. सतीश आबा चेडे यांनी विशेष पुढाकार घेतला.
प्रशासकीय यंत्रणेची प्रभावी उपस्थिती
कार्यक्रमासाठी तहसील कार्यालय पाचोरा येथील महसूल व पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना विभाग व श्रावणबाळ योजना विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यामध्ये पुरवठा विभागाच्या अधिकारी सौ. सुषमा उरकुडे मॅडम, संजय गांधी निराधार योजना विभागाचे मा. श्री. भरत परदेशी, तसेच महसूल सहायक श्री. विजय पाटील, श्री. शुभम सपकाळे व पुरवठा विभागाचे श्री. साहेबराव पाटील हे अधिकारी नागरिकांच्या अडचणी ऐकून जागेवरच तात्काळ कार्यवाही करताना दिसून आले.
शिवसेना–युवासेनेचा सक्रिय सहभाग
या कॅम्पमध्ये शिवसेना (शिंदे गट) व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये किरण परदेशी (युवासेना शहर संघटक), श्याम पाटील (शिवसेना बूथ प्रमुख), योगेश कोळी (प्रभाग शाखा प्रमुख), ईश्वर मराठे, भालेराव, सचिन पाटील, नितिन निकुंभ, महेंद्र पवार, गणेश भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या समस्या थेट मांडल्या व त्वरित उपाय मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ थेट गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांमधून या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक व स्वागत होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद