"नगरपरिषद आपल्या दारी” उपक्रमाने पाचोऱ्यात स्वच्छतेचा नवा अध्याय
राजेंद्र खैरनार मुख्य संपाद सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने “नगरपरिषद आपल्या दारी – स्वच्छता व तक्रार निवारण मोहीम” शहरभर राबविण्यात येत असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि. २६ जानेवारी पासून सुरू झालेल्या या अभियानाची संकल्पना मा. नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोरआप्पा पाटील व उपनगराध्यक्ष श्री. किशोर गुणवंत बारवकर यांची असून, प्रशासन थेट जनतेपर्यंत पोहोचावे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मध्ये
दि. ७ व ८ फेब्रुवारी रोजी
सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत
विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे व परिसर स्वच्छ करण्यावर भर देण्यात येणार आहे.
तसेच नागरिकांच्या नागरी समस्या, तक्रारी व सूचनांचे थेट निवारण करण्यासाठी
दि. ९ फेब्रुवारी (सोमवार)
सकाळी ११ वाजता
संत गाडगेबाबा नगर चौक, पाचोरा
या शिबिरात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे, कर व इतर नागरी समस्यांबाबत थेट तक्रार नोंदवण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, आपली तक्रार मांडावी व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक मा. गणेश भिमराव पाटील व मा. सौ. मिनाक्षी संजय एरंडे यांनी केले आहे.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.
“स्वच्छ पाचोरा – सुंदर पाचोरा” हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
🙏 स्वच्छ पाचोरा, सुंदर पाचोरा 🙏
Comments
Post a Comment