खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.नेहा संतोष मोरे यांची राष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड; केरळ येथे करणार प्रतिनिधित्व


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा भारत युवा केंद्र’ या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कु. नेहा संतोष मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत जिल्ह्यातील आणखी आठ युवकांचीही निवड झाली असून, एकूण नऊ युवकांचा हा गट या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. हा गट २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत Kerala राज्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक दौऱ्यावर जाणार असून, जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर दौरा कमलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश विविध राज्यांतील युवकांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे, नेतृत्वगुणांचा विकास घडविणे तसेच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणे हा आहे.

कु. नेहा संतोष मोरे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर अधिक उंचावला असून, जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रउभारणीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या यशातून मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद