संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीला भक्तीचा महापूर; शिवभक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
खाजोळा येथील प्राचीन संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भक्तीचा अभूतपूर्व महापूर उसळला. आज पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
या पवित्र दिवशी नेरी येथील गोविंदभाऊ शेलार यांच्याकडून भाविकांसाठी साबुदाणा फराळाचे वाटप करण्यात आले, तर श्रीकृष्ण शिवराम पाटील यांनी केळी वाटप करून शिवभक्तांची सेवा केली.
महाशिवरात्रीच्या विशेष दिवशी गोविंदभाऊ शेलार यांनी सपत्नीक रुद्राभिषेक व महाआरती केली. यावेळी एपीआय प्रवीणदादा पवार, ज्ञानेश्वर पाटील व गणेश पाटील यांनीही सपत्नीक पूजा-अर्चा व आरतीत सहभाग नोंदवून श्रद्धा व्यक्त केली.
फराळ वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश ज्ञानेश्वर पाटील, पंकज दैवत पाटील, किरण गुलाब पाटील, निलेश बापूराव पाटील, बापूराव दिनकर पाटील, संदेश कैलास पाटील, अमोल रावसाहेब पवार, राहुल मग्न पाटील व सागर योगराज पाटील यांनी परिश्रम घेतले.
श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम साधत साजऱ्या झालेल्या या महाशिवरात्रीने खाजोळा परिसरात भक्तीचा नवा अध्याय घडवून आणला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद