भडगाव विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पाचोरा महाविद्यालयाची कु. गायत्री क्षीरसागर प्रथम
✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा | दि. १४ फेब्रुवारी २०२६
भडगाव येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित स्व. आबासो. मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतिकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेत पाचोरा येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले.
तिला संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते रोख ₹५,०००, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक मा. श्री. दादासाहेब खलील देशमुख, स्पर्धेचे प्रायोजक मा. श्री. बाबासाहेब विनय जकातदार, मा. श्री. आप्पासाहेब सतीश चौधरी, मा. श्री. दादासाहेब रमेश जकातदार, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एन. एन. गायकवाड, माजी प्राचार्य मा. श्री. अरुण पाटील, परीक्षक मा. सौ. सुनंदाताई जकातदार, मा. श्री. सुनील पाटील, मा. डॉ. विजय पालवे, स्पर्धा समन्वयक डॉ. अतुल देशमुख यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. श्री. भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ, मानद सचिव मा. ॲड. महेश देशमुख, संस्था व महाविद्यालय परिवाराने विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. तसेच पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक मा. डॉ. शरद पाटील, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा समिती समन्वयक प्रा. स्वप्नील वाय. भोसले व प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment