“शब्दांच्या आकाशात गगनभरारी घेणारी चेतना हिरे — संघर्ष, साधना आणि स्वप्नांची प्रेरणादायी यशोगाथा”
✍️ राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
(शब्दांकन | पुनम ठाकूर, एरंडोल)
आजचा दिवस चेतना हिरेसाठी केवळ वाढदिवसाचा नाही, तर संघर्षातून घडलेल्या यशाच्या प्रवासाचा उत्सव आहे. जिद्द, मेहनत आणि स्वप्नांच्या पंखांवर उडणारी चेतना ही केवळ एक वक्ता किंवा लेखिका नाही, तर तरुणाईसाठी प्रेरणेचा जिवंत दीपस्तंभ आहे.
चेतनाचा प्रवास हा सामान्य विद्यार्थिनीपासून शब्दांची शक्ती समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रभावी वक्तृत्वकलेपर्यंतचा आहे. लहानपणापासूनच शब्दांशी असलेले तिचे नाते तिला स्पर्धा, व्यासपीठ आणि समाजकार्याच्या मार्गावर घेऊन गेले.
८वीत तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक, ९वीत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक, १०वीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक—हे केवळ पुरस्कार नव्हते, तर तिच्या प्रतिभेची पहिली ओळख होती. पुढे SYBA ला जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून तिने सातत्य आणि चिकाटीचा ठसा उमटवला.
वक्तृत्वाच्या मंचावर तर चेतनाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. FYBA भुसावळ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय, FYBA लोहारा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय, TYBA लोहारा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय—या यशाने तिचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला. TYBA राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक आणि SYBA आंतर-विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सांघिक चषक हा तिच्या कष्टांचा गौरव ठरला.
केवळ वक्तृत्वच नव्हे तर काव्य, लेखन आणि सामाजिक विचारांमध्येही चेतनाने आपली लेखणी प्रभावीपणे चालवली. SYBA विद्यापीठस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तिने शब्दांना भावनांची धार दिली. विविध वर्तमानपत्रे व साप्ताहिकांमधून प्रकाशित झालेले तिचे लेख हे सिद्ध करतात की तिची लेखणी समाजाच्या जाणीवांना स्पर्श करणारी आहे.
या यशामागे गुरुजनांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. जिल्हा परिषद शाळेतील संजय प्रजापत सर, विद्या वसईकर मॅडम, स्वाती पाटील मॅडम यांनी शब्दांची ओळख करून दिली. माध्यमिक शाळेत संगीता सूर्यवंशी मॅडम यांनी त्या शब्दांना रचना दिली. महाविद्यालयीन जीवनात प्रा. जयश्री वाघ मॅडम यांनी प्रेरणा देत सांगितले—
“मागे फिरू नकोस, संधी सोडू नकोस, आकाश तुझ्यासाठी मोकळं आहे… तू गगनभरारी घे!”
हे शब्द तिच्या जीवनमंत्रासारखे ठरले.
समाजासाठी काहीतरी करण्याच्या ध्यासाने चेतनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही पाऊल ठेवले. भारतीय जनता पार्टीच्या बेटी बचाव, बेटी पढाओ अभियानाच्या पाचोरा तालुका अध्यक्ष म्हणून तिला समाजसेवेचे व्यासपीठ मिळाले. स्त्रीशिक्षण, समाजजागृती आणि तरुणाईच्या प्रेरणेसाठी तिचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे.
आज चेतना हिरे केवळ स्पर्धा जिंकणारी विद्यार्थिनी नाही, तर समाजात विचार जागवणारी लेखिका, प्रभावी वक्ता आणि प्रेरणादायी नेतृत्वाची चाहूल आहे. तिचा आवाज केवळ व्यासपीठापुरता नाही, तर समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा आहे.
🎉 वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
प्रिय चेतना,
तुझ्या स्वप्नांना नवी दिशा मिळो,
तुझी लेखणी समाजाला जागृत करो,
तुझा आवाज अन्यायाविरुद्ध बुलंद होवो,
आणि तुझं आयुष्य यश, आनंद व समाधानाने उजळत राहो.
गगनभरारी घेणाऱ्या चेतनाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
— पूनम ठाकूर, एरंडोल
Comments
Post a Comment