सात तासांच्या अथक परिश्रमातून साकारली भक्तीची कलाकृती – पुनगाव रोड येथील गजानन महाराज मंदिरात भव्य रांगोळी सेवा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
१४८ व्या श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पुनगाव रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावपूर्ण व आकर्षक रांगोळी सेवेचे आयोजन करण्यात आले. तब्बल सात तासांच्या अथक परिश्रमातून ही भावस्पर्शी व कलात्मक रांगोळी साकारण्यात आली आहे.
या भव्य रांगोळी सेवेतून श्री गजानन महाराजांचे दिव्य रूप व त्यांच्या संदेशाचे अत्यंत सुंदर व प्रभावी चित्रण करण्यात आले असून भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ही रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी, सत्यजीत पाटील, ओमकार केंडले, ओम् पाटील, देवांगिनी मोकाशी व अमन कुमार यांनी भक्तिभावाने रेखाटली.
ही अप्रतिम रांगोळी पाहण्यासाठी भाविक व नागरिकांनी पुनगाव रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद