पाचोरा तालुक्यात शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा; गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा सभा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 

पाचोरा | प्रतिनिधी —
पाचोरा तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुखांची सविस्तर आढावा सभा घेण्यात आली. या सभेत चालू शैक्षणिक कामकाजाचा सखोल आढावा घेत पुढील काळासाठी महत्त्वपूर्ण सूचना व दिशा देण्यात आल्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी श्री. विजय पवार होते. त्यांनी मिशन मोडमध्ये शिक्षण विभागाचे उपक्रम राबविण्याचे स्पष्ट निर्देश देत, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य उद्देश असला पाहिजे,” असे ठाम मत व्यक्त केले.
सभेत पुढील महत्त्वाचे निर्णय व सूचना देण्यात आल्या —
मिशन स्कॉलरशिप अंतर्गत दि. 6 व 13 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांची सराव चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
तालुक्यातील सर्व शाळांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पुढील चाचणी दि. 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून, त्यासाठी नियमित निपुण तासिका घेऊन वर्गात पुरेसा सराव करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांसाठी भरारी पथक व बैठे पथकाचे नियोजन करण्यात आले.
समन्वय सभेत दिलेल्या सर्व सूचना शाळास्तरावर प्रभावीपणे पोहोचवून शाळा स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.
यावेळी शा. पो. आ. अधीक्षक श्रीमती सरोज गायकवाड व शिक्षण विस्तार अधिकारी श्री समाधान पाटील यांनीही मार्गदर्शन करत प्रशासन, शिक्षक व केंद्र प्रमुख यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
या महत्त्वपूर्ण आढावा सभेस तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता राखण्यासाठी गट शिक्षणाधिकारी श्री. विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद