पिचर्डे विकासोच्या चेअरमनपदी आदर्श शेतकरी श्रीराम रामदास पाटील यांची बिनविरोध निवड
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य न्यूज चॅनल
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील पिचर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आदर्श शेतकरी श्रीराम रामदास पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या चार वर्षांपूर्वी पिचर्डे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले होते. ठरल्याप्रमाणे विद्यमान चेअरमन उध्दव नामदेव महाजन यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर श्रीराम रामदास पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी व्हा. चेअरमन हिलाल ओंकार महाजन, संचालक साहेबराव दौलत पाटील, उध्दव नामदेव महाजन, श्रावण रतन लिंडायत, मुरलीधर रामा पाटील, बबन मन्साराम पाटील, प्रविण सजन कुंभार, अशोक धर्मराज पाटील, हेमराज प्रकाश पाटील, सौ. बेबाबाई भालचंद्र पाटील तसेच सचिव नानासाहेब मोतीराम पाटील, लिपीक वसंत पंडित पाटील व शिपाई निंबा बाबुलाल पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment