वेगवान वाहने आणि भटक्या कुत्र्यांचा धोका; पाचोरा नगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात — नागरिकांची जोरदार मागणी

✍️ राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या वेगवान वाहनांमुळे अपघाताचा धोका गंभीर स्वरूपात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रेल्वे भूयारी मार्ग ते श्री छत्रपती शिवाजी चौक व तेथून जामनेर रोड श्रीराम मंदिर उतार चौक, चावडी मस्जिद चौक या मार्गावर वाहनांची गती महामार्गापेक्षाही अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर बसविणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
या मार्गावर शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी व पादचारी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे भारत डेअरी बस स्टाप,श्री विठ्ठल मंदिर (जुने) रोड — चावडी तलाठी कार्यालयापासून इब्राहिमजी हाजी (मोठे बोहरी) दुकानापर्यंत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मोकाट भटक्या कुत्र्यांचा वावर आढळून येत आहे. हे कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावणे, अंगावर झेप घेणे व चावणे अशा घटना नित्याच्या झाल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांनी पाचोरा नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन
१)संबंधित रस्त्यांवर तात्काळ स्पीड ब्रेकर बसवावेत
२)वेगमर्यादा पाट्या व चेतावणी फलक लावावेत
 ३)भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी पकड व निर्बंधात्मक उपाययोजना कराव्यात
अशी जोरदार मागणी केली आहे.
शहरातील वाढती वाहतूक व नागरी समस्या लक्षात घेता प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद