जागतिक कर्करोग दिनानिमित्त रोटरी क्लब पाचोरा-भडगावतर्फे थेलेसेमीया तपासणी शिबीर

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी –
जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागृती विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी थेलेसेमीया तपासणी व जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची थेलेसेमीया आजारासाठी रक्त तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी थेलेसेमीया या आजाराविषयी सविस्तर माहिती देत प्रतिबंध व लवकर निदानाचे महत्त्व स्पष्ट केले. तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव व जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांनी ग्राहक हक्क व संबंधित कायद्यांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण १५० विद्यार्थ्यांची थेलेसेमीया तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, रोटरी सदस्य डॉ. गोरख महाजन, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. कुणाल पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, तसेच संजय कोतकर, ज्ञानेश्वर पाचोळे उपस्थित होते.
याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक आर. जी. सावंत सर यांच्यासह शिक्षकवृंद व्ही. एम. गरुड, एस. एल. पाटील, डी. टी. पाटील, टी. आर. पाटील, श्रीमती एस. पी. पाटील, श्रीमती एस. एस. पवार, डी. आर. कोळी, एस. आर. बागुल, आर. आर. पाटील, श्रीमती जे. जे. पाटील, आर. ए. पाटील, एन. एम. वाघ, एस. एल. चव्हाण, एस. के. वाघ, श्रीमती एस. आर. बोरसे, श्रीमती एस. के. अहिरराव, डी. एफ. पाटील आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीस चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद