रोटरी क्लब पाचोरा–भडगावचा सामाजिक वसा जपला : पोलीस बांधवांसाठी रक्त व आरोग्य तपासणी शिबीर

पाचोरा | प्रतिनिधी
रोटरी क्लब पाचोरा–भडगावच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून अखंडपणे पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत रक्त तपासणी व सर्वांगिण आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या शिबिरास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम साहेब, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रोटरी क्लब पाचोरा–भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी डॉ. गोरख महाजन, डॉ. राहुल काटकर, डॉ. कुणाल पाटील, डॉ. घनश्याम चौधरी, निलेश कोटेचा, संजय कोतकर आदी मान्यवर व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या रक्त तपासणीने शिबिराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय व पाचोरा पोलीस स्टेशन येथील सुमारे ७० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्त तपासणी व आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल्य लॅबचे डॉ. गोरख महाजन, डॉ. अक्षय महाजन तसेच लॅब टेक्निशियन सुशांत बागुल यांनी मोलाचे सहकार्य केले.
रोटरी क्लब पाचोरा–भडगावचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरत असून पोलीस बांधवांच्या आरोग्य रक्षणासाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद