लोकशाहीचा सजग प्रहरी गमावला; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार(मुंबई) संघाचा शोकांजली अर्पण


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल

जळगाव प्रतिनिधी:
जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय कै. अजितदादा पवार यांना समर्पित सर्वपक्षीय शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला. या शोकसभेला प्रशासकीय अधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांचे मन जड झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका संवेदनशील, संवादप्रिय आणि अभ्यासू नेतृत्वाचा अस्त झाला आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमांचे महत्त्व ओळखून पत्रकारांच्या प्रश्नांना संयमाने आणि गांभीर्याने उत्तर देणारा नेता म्हणून कै. अजितदादांची ओळख होती.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने या शोकसभेत कै. अजितदादांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सत्य, निर्भीड पत्रकारिता आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान करणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाची उणीव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कायम जाणवेल.
कै. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असून, त्यांच्या कार्याचा वारसा आणि लोकशाहीवरील विश्वास पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद