पाचोरा शहरातील बाहेरपुरा येथे संत रोहिदास महाराजांचा विचारांचा जागर — चर्मकार महासंघातर्फे जयंती उत्साहात साजरी

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
सामाजिक समता, श्रमप्रतिष्ठा आणि माणुसकीचा संदेश देणारे थोर संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांची जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघ, पाचोरा तालुका व शहर यांच्या वतीने दिनांक १ फेब्रुवारी (रविवार) रोजी पाचोरा शहरातील बाहेरपुरा परिसरातील जवाहर हौसिंग सोसायटी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. ज्ञानेश्वर मोरे (नाना मिस्तरी), श्री. अनिल सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. संत रोहिदास महाराजांचा समतेचा, अन्यायाविरोधातील आणि श्रमाच्या गौरवाचा विचार आजच्या समाजाला दिशा देणारा असल्याचे यावेळी उपस्थितांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमास परिसरातील समाजबांधव श्री डाॅ. नितीन तायडे ,श्री अशोक परशुराम वाघ, पप्पू वाघ (टेलर), संदीप गाडेकर, सुभाष लिंगायत, रमेश सावंत, राजूभाऊ कानेटकर, पप्पू अहिरे, विशाल लिंगायत, संजय मोरे, संजय बोरसे, आबाभाऊ लिंगायत, कुणाल लिंगायत, चेतन अहिरे यांच्यासह चर्मकार समाजातील बाळगोपालांपासून वयोवृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त एकतेचा संदेश देत समाजातील तरुणांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांची मशाल पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद