आर.डी. फाउंडेशन व शकुंतलाई हॉस्पिटलचा सामाजिक आरोग्य संकल्प – शेवाळे येथे 400 हून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी –
आर.डी. फाउंडेशन पाचोरा आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शेवाळे येथे दि. 14 फेब्रुवारी रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरास गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 400 हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये विविध आजारांवर तपासणी, मार्गदर्शन तसेच प्राथमिक उपचार करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणी मोफत उपलब्ध करून देण्याचा सामाजिक उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आर.डी. फाउंडेशनचे उपाध्यक्ष अँड. रणजीत तडवी यांनी सांगितले. भविष्यातही आर.डी. फाउंडेशनच्या माध्यमातून असे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. रोहित ब्राह्मणे, सचिव मा. भिमराव खैरे, नगरसेवक तथा संस्थेचे संचालक मा. प्रवीण ब्राह्मणे यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सिद्धांत तेली व डॉ. सोनालीताई तेली तसेच इशान्वी क्लिनिक शेवाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी शबाना तडवी, दीपाली चौधरी, समिशा ससाने, हीना तडवी यांनी परिश्रम घेत उल्लेखनीय सहकार्य केले. यावेळी डॉ. सिद्धांत तेली व डॉ. सोनालीताई तेली यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शेवाळे ग्रामपंचायत सरपंच लताताई भोसले, सामाजिक कार्यकर्ते नितिन भोसले, सुनील पाटील, पत्रकार संतोष मोरे, सुरेश तडवी, दिनकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण पांडे, रज्जाक तडवी, साहेबराव तडवी, शरद पांडे, प्रवीण तडवी, समीर तडवी, मज्जीद तडवी, अनिस तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा घरपोच पोहोचविण्याच्या दिशेने हा उपक्रम एक प्रेरणादायी सामाजिक पाऊल ठरला असून आर.डी. फाउंडेशन व शकुंतलाई हॉस्पिटलच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद