विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय परिषदेत प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ यांना राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनेल

 लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कॉलेज, च्या वाणिज्य विभागामार्फत आयोजित ‘विकसित भारत @2047’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या सत्रात बोलत होत्या. ही परिषद दि. 13 व 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवरानगर, ता. राहता, जि. अहिल्यानगर येथील APJ Abdul Kalam Seminar Hall येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे यांनी सांगितले की पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागाचा विकास करत असताना सहकाराच्या माध्यमातून हा विकास साधला. आज ग्रामीण भारत सक्षम करण्यासाठी प्रवरा परिसराचा आदर्श महत्त्वपूर्ण ठरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, K. B. P. College च्या  अधिष्ठाता डॉ. हर्षा गोयल, कर्नाटक येथील डॉ. विद्या जिरगे, मुंबई येथील डॉ. चंद्रशेखर देवरे, डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार, डॉ. भाऊसाहेब रणपिसे तसेच वाणिज्य विभागातील तज्ञ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांतून एकूण 170 संशोधन निबंध प्राप्त झाले. त्यापैकी सुमारे 40 संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी आपले संशोधन निबंध सादर केले.

श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांना ‘बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन’चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. भारताच्या विकासासाठी आपण आपले योगदान देताना सुरुवात स्वतःपासून करावी.स्वतःचा विकास केल्यास त्यातून देशाचाही विकास साध्य होईल. हे  करीत असतांना मानव म्हणून मानवा सारखे वागणे ही तितकेच महत्त्वाचे आहे आणि येत्या काळात भारत जागतिक महासत्ता देश बनल्याशिवाय राहणार नाही, असे मत प्राध्यापिका सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी व्यक्त केले.

प्रारंभी डॉ. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. ए. पवार यांनी महाविद्यालय व संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत परिषदेचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विजय खर्डे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद