पाचोरा एम. एम. महाविद्यालयात अद्ययावत संगणक लॅबचे उद्घाटन
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
दिनांक २१ जानेवारी रोजी पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बी.एस्सी. (कॉम्प्युटर) व बीसीए शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज अशा संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संस्थेने उभारलेली ही अद्ययावत संगणक लॅब आज प्रत्यक्षात साकार झाली. या संगणक लॅबचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे येथील सुप्रसिद्ध वक्ते व व्याख्याते श्री. अशोक देशमुख, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा. सुभाष तोतला, अण्णासाहेब दगाजी वाघ, डॉ. जयंतराव पाटील, नानासाहेब सुरेश देवरे, आप्पासाहेब सतीश चौधरी, प्रकाश एकनाथ पाटील, योगेश दादा पाटील, आकाश वाघ, काकासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, प्राचार्य शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा-वाघ, श्री. नितीन पाटील, श्री. ऋषिकेश ठाकूर तसेच प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रदीप देसले, प्रा. महेंद्र महाजन, प्रा. डी. एस. पाटील, प्रा. ललित पाटील, प्रा. गौरव चौधरी, प्रा. गिरीशचंद्र पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगणक लॅब उभारणीसाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल प्रा. स्वप्नील ठाकरे, प्रा. डॉ. शरद पाटील, भूषण साळुंखे, संगणक विभागप्रमुख (HOD) प्रा. प्रियंका पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इंस्टॉलेशन, फॉरमॅटिंग व नेटवर्किंगचे काम यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मनोज मिस्त्री, प्रतीक पाटील, भूषण कुमावत व स्वप्नील चौधरी यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी केले
Comments
Post a Comment