कोळगाव महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
भडगाव प्रतिनिधी
कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ तसेच युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्री. सुरेश आनंदा कोळी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद तसेच संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर तब्बल २५ विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर मनोगत व्यक्त करत त्यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा. श्री. दिनकर सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रीमती प्रविणा पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डी. पी. भोसले यांनी प्रभावीपणे पार पाडले. आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती सुनीता पाटील यांनी मानले.
या वेळी प्रा. संदीप बाविस्कर, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. मनीष पाटील, प्रा. मनोज पाटील, प्रा. राहुल सोनवणे, प्रा. मनीषा बोरसे, श्रीकांत हिरे, तेजस पवार, चेतन पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व प्रेरणादायी विचारांची रुजवण झाली.
Comments
Post a Comment