रोटरी क्लब पाचोरा–भडगावतर्फे थेलेसेमिया तपासणी व जनजागृती शिबिराचा यशस्वी उपक्रम


(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चैनल) 

पाचोरा–भडगाव | प्रतिनिधी
रोटरी क्लब पाचोरा–भडगाव यांच्या पुढाकारातून संपूर्ण पाचोरा–भडगाव तालुक्यात थेलेसेमिया तपासणी व जनजागृती मोहिमेचा श्रीगणेशा लोहटार येथील एम. एम. महाविद्यालयापासून करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब व एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सहभागातून थेलेसेमिया या आनुवंशिक आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
या शिबिरात एकूण ६१ विद्यार्थ्यांची थेलेसेमिया संदर्भात रक्त तपासणी करण्यात आली, तर लोहटार गावातील सुमारे ३०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, रोटरी सदस्य व उपप्रांतपाल भरत सिनकर, डॉ. सिद्धांत तेली, संजय कोतकर, डॉ. अभिषेक जगताप, महालॅब्सचे शुभम पाटील, लक्ष्मण जाधव तसेच ओम हॉस्पिटलचे वैद्यकीय व सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. मुकेश तेली यांनी थेलेसेमिया या आजाराची कारणे, प्रतिबंध व वेळेवर तपासणीचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. याचवेळी सेंद्रिय शेतीविषयी मयूर वाघ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून आरोग्यदायी जीवनशैलीवर भर दिला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य वासुदेव वले, प्रा. स्वप्निल भोसले, डॉ. कीर्ती सोनवणे, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. सागर पाटील, प्रा. सागर पाटील, डॉ. सुवर्णा पाटील, प्रा. अक्षय तडवी, प्रा. अक्षय शेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या आरोग्य शिबिरास गावातील महिला–पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद