एम.एम. कॉलेज पाचोरात १०० गरजू विद्यार्थ्यांना एमपीएससी पुस्तकांचे मोफत वाटप; स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नांना बळ
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
प्रबोधन प्रतिष्ठान पुणे व सावित्री शक्तीपीठ पुणे शाखा पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एम.एम. कॉलेज, पाचोरा येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत १०० विद्यार्थ्यांना एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके मोफत वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी सिनेट सदस्य तथा कार्यक्रमाध्यक्ष माननीय माजी प्राचार्य डॉ. बी. एच. जाधव (धुळे) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्राध्यापक एस. बी. महाजन (रावेर), आर. पी. बागुल, सईद पंजाबी, प्रियांका सोनवणे, आरपीआय महिला अध्यक्ष, अनिस खान, डॉ. संजय माळी, डॉ. अतुल महाजन, हाजी असलम (लिबास बिल्डर), डॉ. जी. एस. महाजन, मिलिंद सोनवणे, डॉ. प्रविण माळी, राजाराम आप्पा सोनार, उपप्राचार्य डॉ. वले, प्रकाश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक एस. बी. महाजन (रावेर) व राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करत अभ्यासाची दिशा, सातत्य व आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. पुस्तकांचे वाटप हे केवळ शैक्षणिक मदत नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिलेले बळ असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख ब्राह्मणे (पुणे) यांनी केले, तर आभार प्रदर्शन के. एस. महाजन यांनी मानले. या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाची संकल्पना अॅड. भाग्यश्री महाजन यांची असून, त्यांच्या पुढाकारामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नांना नवे बळ मिळाले आहे.
Comments
Post a Comment