विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला चालना — कै. पि. के. शिंदे विद्यालयात शैक्षणिक प्रोजेक्टरचे वितरण
पाचोरा | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी, आधुनिक व तंत्रज्ञानाधिष्ठित व्हावे या उद्देशाने शिक्षक आमदार मा. श्री. किशोर दराडे साहेब यांच्या हस्ते कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रोजेक्टरचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम दि. २ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाला.
या उपक्रमामुळे अध्यापन प्रक्रियेत दृक्श्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर होऊन विद्यार्थ्यांची समज, उत्सुकता व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक साधनांची आवश्यकता असून, त्यासाठी आपण सदैव सहकार्य करीत राहू, असे आमदार दराडे साहेबांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आप्पासो. संभाजी पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक हरिष सर, पाचोरा तालुका संपर्कप्रमुख संतोष पैठणकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जी. व्ही. सोमवंशी सर, पर्यवेक्षक श्री. व्ही. पी. देशमुख सर, तसेच शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या या मोलाच्या योगदानाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जी. व्ही. सोमवंशी सर यांनी शिक्षक आमदार मा. श्री. किशोर दराडे साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment