पाचोरा नगरपरिषदेत भाजपाचा विश्वास; ॲड. अविनाश सुतार स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल

पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज झालेल्या विशेष बैठकीत भारतीय जनता पक्षाचे ॲड. अविनाश देविदास सुतार यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. या निवडीमुळे नगरपरिषदेत भाजपाची भूमिका अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून आले.
नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपाचे गटनेते सुरज वाघ, नगरसेविका कविता पाटील, कविता हटकर, अमरीन देशमुख, नगरसेवक राहुल गायकवाड, गोपाल वासवाणी यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. अविनाश सुतार यांच्या निवडीबद्दल माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमोल शिंदे, माजी गटनेते संजय वाघ, दीपक माने, शिवदास पाटील, समाधान मुळे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, भूषण वाघ, जगदीश पाटील, भैय्या ठाकूर, योगेश पाटील, ललित सुतार, प्रवीण पाटील, आकाश लांडगे, रावजी बावचे, बंटी महाजन, अनिल पाटील, सतीश चौधरी, विनोद पाटील, टिपू देशमुख, बंटी हटकर, निलेश पाटील, चंद्रकांत चौधरी, गणेश पाटील, संजू भोई, अनिल धना पाटील, खुशाल कुंभार, राकेश महाजन, दामू पाटील, लकी पाटील, वाल्मिक महाजन, सोमनाथ महाजन, अनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. अविनाश सुतार यांच्या या नियुक्तीबद्दल नामदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी तसेच भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद