आशिर्वादाच्या बहाण्याने सोन्याच्या अंगठ्या लंपास; भडगाव परिसरात साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक प्रकार



भडगाव | प्रतिनिधी
पाचोरा येथील राजेंद्र भिकनसिंग पाटील व त्यांची पत्नी सौ. सुरेखा राजेंद्र पाटील हे आज दिनांक २१ जाने.बुधवार रोजी दुपारी  आपल्या गावी वडगाव मुलाने येथे मोटारसायकलने जात असताना भडगावच्या पुढे कोठली फाट्याजवळ साधूवेशातील दोन इसमांनी त्यांना थांबवले. पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या मारुती स्विफ्ट कारमधून आलेल्या या इसमांनी नाशिककडे जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने संवाद साधला.
यानंतर “आशिर्वाद देतो” असे सांगत त्यांनी दाम्पत्याला १०० रुपये दिले व त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या देण्यास सांगितले. क्षणिक भुलवणुकीला बळी पडून वयस्कर दाम्पत्याने अंगठ्या काढून दिल्या. पुढे “मोटारसायकल साईडला लावा, आशिर्वाद देतो” असे सांगत त्या दोघांना थांबवून साधूवेशातील इसम स्विफ्ट कार घेऊन पसार झाले.
या घटनेनंतर पाटील दाम्पत्याने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, परिसरात नागरिकांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. साधूवेशाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या इसमांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद