देवयानी संस्कृत श्लोक ऑलिंपियाडमध्ये पाचोराच्या रूपाली दुसे-शेंडे यांचा मुंबईत सन्मान


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी :
देवयानी संस्कृत श्लोक ऑलिंपियाडतर्फे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृत श्लोक स्पर्धेत पाचोरा येथील रूपाली दिनेश दुसे-शेंडे यांनी आपल्या कला-गुणांच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत मानाचा सन्मान पटकावला. उत्कृष्ट सादरीकरण आणि संस्कृतप्रेमाची दखल घेत त्यांचा सत्कार करून सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
रूपाली दुसे-शेंडे या पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या असून महिला मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये त्या सातत्याने सक्रिय भूमिका बजावत आहेत. समाजप्रबोधन, संस्कृती जतन तसेच महिलांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. विविध वेषभूषा व कल्पक सादरीकरणातून त्यांनी अनेक कार्यक्रमांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या देवयानी संस्कृत श्लोक ऑलिंपियाडमध्ये त्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी श्लोकसादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन आयोजकांतर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला प्रतिनिधी तसेच संस्कृतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूपाली दुसे-शेंडे यांच्या या यशामुळे पाचोरा शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद