शेती आणि शेतकऱ्यांशी बांधिलकी जपणारे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रगतशील शेतकऱ्याच्या बागेला भेट
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
राजकीय व्यासपीठावर केवळ भाषणे देण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीविषयी आस्था जपणारे नेतृत्व म्हणजे पाचोरा–भडगावचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री. किशोर आप्पा पाटील. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत त्यांनी आज शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख व प्रगतशील शेतकरी श्री.सुनील पाटील यांच्या शेताला भेट देत प्रत्यक्ष शेतीची पाहणी केली.
यावेळी आमदार पाटील यांनी मोसंबी व पपईच्या बागेची बारकाईने पाहणी करत बागेची मशागत, बहार व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता तसेच विक्री व्यवस्थेतील अडचणी याबाबत माहिती घेतली. आधुनिक शेती, बाजारपेठेतील बदल आणि शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पन्न कसे घ्यावे याबाबत चर्चा करत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या समस्या कार्यालयात बसून नव्हे तर बांधावर उभं राहून समजून घेण्याची भूमिका आमदार किशोर आप्पा पाटील यांची आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास व आपुलकी निर्माण झाली असून, अशा भेटींमुळे तरुण शेतकऱ्यांना नवी दिशा व आत्मविश्वास मिळत आहे.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.बापूसो गणेश पाटील तसेच सहकारी बापू काकडे, भगवान पांडे, दगा अण्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी परिसरातील धरणांमधील पाणी साठा वाढवण्यासाठी उपाय योजना तलावांना एकमेकांशी जोडण्यासाठी योजना करण्याबाबतही आमदारांनी सुतोवाच केले.
Comments
Post a Comment