पाचोरा नगरकारभारात नवा अध्याय : माऊली जेष्ठ संस्थेकडून नगराध्यक्षा सुनीताई पाटील व उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांचा भव्य सत्कार


राजेंद्र खैरनार,मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल

पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. सौ. सुनीताई किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असताना, त्यांच्या सन्मानार्थ माऊली बहुउद्देशीय जेष्ठ नागरिक संस्था, पाचोरा यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. नगरकारभारात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या नेतृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात नगरविकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले शिवसेना गटनेते व नगरसेवक मा.सुमित किशोर पाटील तसेच उपनगराध्यक्ष मा. किशोर गुणवंंतराव बारावकर यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शहराच्या प्रशासनात समतोल, कार्यक्षम आणि लोकाभिमुख भूमिका बजावणाऱ्या या नेतृत्वाचा सन्मान हा पाचोरा शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीताई पाटील यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्वच्छता, मूलभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि सर्वसमावेशक विकास या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली असून, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांनीही प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रभावी कार्य सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर माऊली जेष्ठ नागरिक संस्थेने घेतलेला हा सत्कार समारंभ म्हणजे लोकशाहीतील सकारात्मक नेतृत्वाचा गौरव मानला जात आहे.
हा भव्य सत्कार समारंभ बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता,
माऊली ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सावित्री नगर, एम.एम. कॉलेजजवळ, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून,  ज्येष्ठ नागरिक सभासदांनी व पत्रकार बंधूंनी उपस्थिती द्यावी असे असे आव्हान ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम सोनार  व सचिव के.एस.महाजन यांनी केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद