आमदार किशोर दराडे यांच्याकडून पाचोरा कन्या विद्यालयास शैक्षणिक प्रोजेक्टर भेट

राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा
शिक्षक आमदार मा. श्री. किशोर दराडे यांच्या माध्यमातून पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयास शैक्षणिक प्रोजेक्टर भेट देण्यात आला. सदर प्रोजेक्टरमुळे विद्यार्थिनींच्या अध्ययन–अध्यापन प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून शिक्षण अधिक सुलभ व प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
दि. २ जानेवारी रोजी आमदार किशोर दराडे यांचे स्वीय सहाय्यक श्री. हरीश मुंडे, जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते आप्पासाहेब संभाजीराव पाटील, पाचोरा तालुका संपर्क प्रमुख श्री. संतोष पैठणकर यांनी कन्या विद्यालयास भेट देत विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्याकडे औपचारिकरित्या प्रोजेक्टर सुपूर्द केला.
याप्रसंगी विद्यालयातर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आप्पासाहेब संभाजीराव पाटील यांनी नूतन प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांना शुभेच्छा देत शिक्षक सभेला ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रवींद्र चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.
आमदार किशोर दराडे यांनी भेट दिलेल्या शैक्षणिक प्रोजेक्टरमुळे विद्यार्थिनींच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल घडून येईल, तसेच डिजिटल शिक्षणाला चालना मिळेल, असे मत विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद