पाचोरा नगरपालिका प्रभाग क्र. १४ मधून नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल सुरेखा अशोक पाटील यांच्यातर्फे देवी मंदिरात भंडारा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा नगरपालिका प्रभाग क्रमांक १४ मधून नगरसेविका पदी निवड झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक आप्पा पाटील व नवनिर्वाचित नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील यांच्या वतीने नगरपालिका जीन परिसरातील देवी मंदिरात भंडाऱ्याचा धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी सौ. सुरेखा अशोक पाटील व श्री. अशोक आप्पा पाटील या दांपत्याने देवीची विधिवत पूजा, आरती व नैवेद्य अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर परिसरातील सुमारे दोन हजार भाविक व नागरिकांसाठी महाप्रसाद (भोजन) देण्यात आला.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक श्री. रवींद्र पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या विश्वासाला सामाजिक कार्यातून उत्तर देण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त झाला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद