प्रामाणिक पोलिसी सेवेला यश; हरवलेली पर्स शोधून दोन तोळ्याची सोन्याची पोत महिलेकडे सुरक्षित सुपूर्द — पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हरीश गवळी यांची उल्लेखनीय कामगिरी


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा  २३जानेवारी २०२६ शुक्रवार रोजी पाचोरा बस स्थानक परिसरात एका महिलेची पर्स हरवल्याची घटना घडली होती. सदर पर्समध्ये सुमारे दोन तोळ्याची मौल्यवान सोन्याची पोत, रोख २,००० रुपये व महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्स हरवल्याचे लक्षात येताच संबंधित महिला प्रचंड चिंतेत सापडली असताना तिने पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस नाईक हरीश गवळी यांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली.
फिर्यादी महिलेच्या सांगण्यावरून संबंधित बस, प्रवासाचा मार्ग तसेच बस स्थानक परिसरात पोलीस नाईक गवळी यांनी सुमारे एक तास अत्यंत कसून व शिस्तबद्ध चौकशी केली. बसमधील प्रवासी, वाहक, चालक तसेच परिसरातील नागरिकांकडे बारकाईने विचारपूस करण्यात आली. कोणतीही घाई न करता अनुभव, निरीक्षणशक्ती व कर्तव्यभावनेच्या जोरावर तपास पुढे नेण्यात आला.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अखेर तपासाला यश मिळाले असून हरवलेली पर्स मिळून आली. पर्समधील दोन तोळ्याची सोन्याची पोत व रोख रक्कम सुरक्षित अवस्थेत आढळून आली. आवश्यक खातरजमा केल्यानंतर सदर पर्स व सर्व मौल्यवान साहित्य फिर्यादी महिलेच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
पोलीस नाईक हरीश गवळी यांनी दाखवलेली तत्परता, प्रामाणिकपणा व चिकाटी ही पोलीस सेवेतील आदर्श उदाहरण ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ही कामगिरी असून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल फिर्यादी महिलेसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिस दलाच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद